titles

Saurav's bookshelf: read

Antaralatil spot
टाइम मशीनची किमया
प्रेषित
वामन परत न आला
अभयारण्य
Chemical History of a Candle: Twenty-two Experiments and Six Classic Lectures
Teacher
Stories Short and Sweet
The Blue Umbrella
Time Machinechi Kimaya
ओसाडवाडीचे देव
Man Me Hai Vishwaas - Marathi Version
TED Talk Secrets: Storytelling and Presentation Design for Delivering Great TED Style Talks
You Can Win: A Step by Step Tool for Top Achievers
श्यामची आई
Tottochan Cô bé ngồi bên cửa sổ


Saurav Durgekar's favorite books »

Sunday, August 7, 2022

पुस्तक अभिप्राय - तितंबा

तितंबा (Titamba)तितंबा by आबासाहेब कडू (Abasaheb Kadu)
My rating: 5 of 5 stars

विदर्भाचे आबासाहेब कडू नि लियलेली "तितंबा" हा कथासंग्रह. विदर्भाचे लोक म्हणा ण उग रहा. म्या आतापरयत लय गोष्टी वाचल्या आयकल्या, पण "तितंबा" एवढा कधीच नाई हासलो ना राव. पूर्ण हप्ताभर त उडल्यासारखच वाटत व्होत मले. मले त राउण राउण माया गावाच्या वट्यावर बसून गोष्टी खापलणाऱ्या बुडग्यांनचीच आठवण येत हरएक गोष्ट वाचल्यावर.
"तितंबा" मधल्या गोष्टी बमच कॉमेडी हाय. दोन कोंबड्या चा संवाद दाखवला एका गोष्टीत, थ्याही बोलण त कायच्यावर बोलण बर, त बोलायचा ईषय होता स्वर्ग अन् मागच्या जन्माचा, त्याईले वाटे की स्वर्गात पैलवानाण खाल्ल त थ्या स्वर्गात जायन. त्याईच्या फकाल्या लई खतरनाक रंगल्या अन् आपल्यायले खदखद हासवते . कोंबडीचा स्वर्ग ही गोष्ट त वाचलीच पायजे.
अशाच गावगाड्याच्या माहोल माहोल गोष्टी हाय. गावकयची संस्कृति, लोकायचा एकूण सभाव कयते आपल्यायले. वऱ्हाडी भाषेची शब्दाची कनखरपणा कयते. माय व अस म्हणनाऱ्या बायांची माया कयते. त्यात मंग हेमामालिनी सोंगाले येते काय, अन् पाटील अमेरिकेले काय फिरायले जाते, ई व्ही एम् वरच्या बटणायची भांडण, अशा चौदाक गोष्टी हाय.
गूगलच्या पुस्तकाईत फुकट भेट्टे, वाचून घ्या.

View all my review

Monday, May 2, 2022

 

विज्ञाननिष्ठ निबंधविज्ञाननिष्ठ निबंध by V.D. Savarkar
My rating: 5 of 5 stars

आजही आपला सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे हे मिरवत फिरणारे आपल्या आजू बाजूला दिसतील. वेद, ऋचा, स्मृती यांची स्तुती करणारे, ( अनेकांनी ज्याला कधी स्पर्शही केला नसेल, तसेसुद्धा) त्यातील जुनी संस्कृती आताच्या संस्कृती पेक्षा किती प्रगल्भ याचे गुणगान करताना दिसतील. रोग, गरिबी, दुसऱ्यांचा राग, दुष्काळ इत्यादी समस्यांसाठी यज्ञ, उपवास, दोरे गंडे असे उपाय योजणारे अनेक लोक तुम्हाला दिसतात. राग येतो पण तुम्ही अशा लोकांचा विरोध करता का?
अनेक जण नाही करत कारण? " कशाला कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये?" समजा विरोध केलाच तर आम्ही का चूक आहोत याची योग्य अशी कारणमीमांसा करता येणे कठीण असते. आणि जर जोराने / आवाज चढवून जर विरोध केला तर अनेकदा आपणच मूर्ख ठरून अपमानास पात्र ठरतो.
जर आपल्याला वरील उल्लेखलेल्या लोकांना विरोध करून आपला समाज विज्ञानाभिमुख करायचा असेल तर मुद्देसूदपणे आणि विज्ञानाच्या कसोटिंना धरून उत्तरे द्यावी लागेल.
सावरकरांनी तत्कालीन काळात जे समाजात धर्मभोळेपण पसरले, ते दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे ठेवून समाजावर टीका केली. त्यातील अनेक विषय आताच्या पिढीला सुध्या लागू होतात
1. गोपुजा
2. श्रुती- स्मृती- पुरणोक्त विरुद्ध up-to-date संस्कृती
3. यंत्र आणि बेकारी
4. यज्ञाची कुळकथा
5. ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?
आदी विषयांची दिमाखदार मांडणी केली. हा निबंधसंग्रह वाचनीय आहे.

यातील एक विषयाची अशी मांडणी केली....
गोपुजा हा सध्याचा गरम विषय आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर गायीपेक्षा जास्त उपयुक्त अनेक प्राणी आहे, मग गायीचीच पूजा का? गोपुजेच्या भाबड्या श्रध्देचा परकियांनी आक्रमण करताना सैन्यापुढे गायी ठेवून आपल्या हिंदू सैनिकांना मागे केलं. व आपण गोहत्या टाळण्यासाठी राष्ट्रहत्या केली. म्हणजे गोपुजा करत बसण्या ऐवजी कशी गोपालन केले तरी गायीचे उपयोग काडीमात्र कमी होणार नाही. श्रुतीत सांगितले म्हणून गोपुजा करत राहायची, श्रुतीत सांगितलं म्हणून यज्ञात तूप टाकायचे, शृतीत सांगितलं म्हणून प्रेत तिरडीवरच न्यायचं.

ह्या पुस्तकाला वाचताना कोणताही पूर्वग्रह मनात ठेवू नये. ....

View all my reviews

Monday, December 6, 2021

अभयारण्यअभयारण्य by Jayant V. Narlikar
My rating: 4 of 5 stars

Amazing,
It this fascinating to imagine that earth is not a planet where life stars on its own independently. But some other advanced race on other planets has used the earth as their superlab to study evolution. They always keep watch on us, never interrupt other day-to-day activities, but always guide us to overcome natural calamities. They also save us from alien attacks.

With time human species get developed as superior on earth, started to pollute the earth, exploit natural resources at a high rate. But they do not put their hand. But when humans started to make nuclear weapons, almost every country has its own large storage of nuclear weapons. They become alert and diffuse all weapons saving all earth living things.
Also, give the message that keeps this earth-friendly to live.
The author has nicely arranged all periods of earth appropriately.

View all my reviews
टाइम मशीनची किमया (Time Machine Chi Kimaya)टाइम मशीनची किमया by Jayant V. Narlikar
My rating: 4 of 5 stars

डॅा. जयंत नारळीकर लिखीत विज्ञान कथांचा संग्रह.
तसं बघायला गेले तर यांतील सर्वच गोष्टी वाटायला सोप्या आणि थरारक आहेत. पण या पुस्तकातील अनेक गोष्टी ह्या धडा शिकवणाऱ्या आहेत. मुंबई सारख्या महानगर कसे संपुष्टात याचं

View all my reviews

 

टाइम मशीनची किमया (Time Machine Chi Kimaya)टाइम मशीनची किमया by Jayant V. Narlikar
My rating: 4 of 5 stars

डॅा. जयंत नारळीकर लिखीत विज्ञान कथांचा संग्रह.
तसं बघायला गेले तर यांतील सर्वच गोष्टी वाटायला सोप्या आणि थरारक आहेत. पण या पुस्तकातील अनेक गोष्टी ह्या धडा शिकवणाऱ्या आहेत. मुंबई सारख्या महानगर कसे संपुष्टात याचं

View all my reviews

पुस्तक अभिप्राय - तितंबा

तितंबा by आबासाहेब कडू (Abasaheb Kadu) My rating: 5 of 5 stars विदर्भाचे आबासाहेब कडू नि लियलेली "तितंबा" हा कथासंग्रह. विदर्भा...